Gold Price Today: गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीच्या किमतीत आणखीन वाढ!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today: आज गुढीपाडव्याच्या सणानिमित्त महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होत असल्यामुळे सोने चांदी खरेदीवर ग्राहक भर देताना दिसत आहेत. परंतु ऐन सणाच्या मुहूर्तावरच सोन्या-चांदीच्या भावांनी (Gold Price Today) उच्चांकाची पातळी घातली आहे. ज्यामुळे ग्राहक सराफ बाजाराकडे पाठ फिरवणारा दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात अगोदर आजचे भाव तपासा.

मंगळवारी MCX वर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा व्यवहार 70880 रुपयांपासून सुरु झाला आहे. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास आता सोन्याचा भाव 70803 रुपयांवर येऊन पोहचला आहे. तसेच, Good Return नुसार, 9 एप्रिल रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 65,750 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने हे 71,730 रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याच्या सणादिवशी ग्राहकांना सोने खरेदी करताना मोठा फटका बसणार आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 65,750 रुपये
मुंबई – 65,750 रुपये
नागपूर – 65,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 71,730 रूपये
मुंबई – 71,730 रूपये
नागपूर – 71,730 रूपये

चांदीचे आजचे भाव

चैत्र महिन्याला सुरुवात झाल्यापासून चांदीच्या भावात (Gold Price Today) देखील वाढ होत चालली आहे. आज मंगळवारी Good Return नुसार, 10 ग्रॅम चांदीचा भाव 845 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 8450 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 84,500 रूपये अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.