Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किमतींत वाढ; खरेदीपूर्वी आजचे भाव पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| मार्च-एप्रिल महिना सुरू झाला की लग्नसराईला देखील सुरुवात होते. त्यामुळे ग्राहक उत्साहाने सोने खरेदी (Gold Price Today) करण्यावर भर देतात. परंतु याकाळात ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाणार आहे. कारण सोन्या चांदीच्या भावामध्ये घसघशीत वाढ झाली आहे. ही वाढ कमी व्हायचे नाव घेत नाहीये. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मौल्यवान धातूंच्या किमतीनी ग्राहकांना दिलासा दिला होता. मात्र त्यानंतर हेच भाव मोठ्या दराने वाढत चालले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगली कात्री बसणार आहे.

शनिवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,750 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65,270 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,750 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 65,270 रुपयांनी व्यवहार करत आहे. म्हणजेच सोन्याच्या किमतींमध्ये दररोज एक दोन पटीने वाढ होत चालली आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 60,750 रुपये
मुंबई – 60,750 रुपये
नागपूर – 60,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 65,270 रूपये
मुंबई – 65,270 रूपये
नागपूर – 65,270 रूपये

चांदीचे आजचे भाव

टेन्शन वाढवणारी गोष्ट म्हणजे फक्त सोन्याच्या नव्हे तर चांदीच्या किमतींमध्ये (Gold Price Today) दररोज वाढ होत चालली आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 757 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,570 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,700 रूपये अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना या चांदीच्या किमती कमी होईपर्यंत देखील वाट पाहावी लागणार आहे.