खरेदीदारांसाठी गोल्डनचान्स! सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पहा आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | आज ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सलग दोन दिवसांनी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहक बिनधास्तपणे सोन्याची खरेदी करण्यासाठी जाऊ शकतात. रक्षाबंधन सणापासून सोन्याचे भाव बाजारात वाढले होते. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून हेच भाव कमी झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लग्न समारंभासाठी तसेच इतर कार्यक्रमासाठी ग्राहक सोन्याची खरेदी करू शकतात. कारण, शनिवारी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

Good Return वेबसाईटनुसार पाहिला गेले तर, शनिवारी सराफ बाजारातील सोन्याचे भाव उतरले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 54,850 रुपये इतका आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 59,840 रुपये एवढी सुरू आहे. तर MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 55,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,000 रुपये सुरू आहे. MCX वेबसाईटचे आजचे भाव काल प्रमाणे स्थिर आहेत.

Gold Price Today

(Gold Price Today) गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,850 रुपये
मुंबई – 54,850 रुपये
नागपूर – 54,850 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,840 रूपये
मुंबई – 59,840 रूपये
नागपूर – 59,840 रुपये

Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

सोन्या सोबत आज चांदीचे भाव देखील घसरले आहेत. शनिवारी 10 ग्रॅम चांदी 735 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,350 रुपयांनी विकली जात आहे. त्याचबरोबर, 1000 ग्रॅम चांदी ₹ 73,500 रुपये भावाने सुरू आहे. त्यामुळे आजचा दिवस ग्राहकांसाठी गोल्डन चान्स आहे ते एकाच दिवशी सोने आणि चांदीची खरेदी करू शकतात. बऱ्याच दिवसांनी सोन्या-चांदीचे भाव उतरल्यामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला आहे.

प्लॅटिनमच्या आजच्या किंमती

शनिवारी , मौल्यवान प्लॅटिनमच्या किमती उतरल्या आहेत. आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,200 वरून 23,750 रुपयांवर आली आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,37,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आजचा दिवस प्लॅटिनमची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अगदी योग्य आहे. सध्या बाजारात सोन्या चांदीसोबत प्लॅटिनमच्या दागिन्यांची देखील खरेदी वाढली आहे.