Gold Price Today : सोने झाले स्वस्त तर चांदीच्या दरात वाढ; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (18 नोव्हेंबर रोजी) भारतीय (Gold Price Today) फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती खाली आल्याचे दिसून येत आहे. मात्र, आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाल्यास इथे आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज MCX वर सोन्याच्या किंमतींमध्ये 0.01 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर काल MCX वर सोने 0.42 टक्क्यांनी घसरले होते. त्याच वेळी, चांदीचा दर आज 0.38 टक्क्यांनी वाढला आहे. काल चांदीचा दर 1.69 टक्क्यांनी घसरला होता.

Gold Price Today

शुक्रवारी फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव सकाळी 9 :5 वाजेपर्यंत 5 रुपयांच्या किंचित घसरणीने 52,838 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. तसेच आज, MCX वर चांदीची किंमत 233 रुपयांनी वाढून 61,211 रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. काल, गुरुवारीही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.67 टक्क्यांनी घसरून $1,762.02 प्रति औंस झाली. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीची स्पॉट प्राईस1.54 टक्क्यांनी घसरून 21.09 डॉलर प्रति औंस झाली.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,180 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,210 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,180 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक (Gold Price Today) सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत