व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा नवे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज बुधवारी घट झाली आहे. बुधवारी, 7 सप्टेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.51 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 0.74 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेचे (Gold Price Today) सोने सकाळी 256 रुपयांनी घसरून 50025 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. आज सोन्याचा व्यवहार 50,207 रुपयांपासून सुरू झाला. मात्र काही काळानंतर मागणी घटल्यानंतर ती 50,007 रुपये झाली. पण नंतर त्यात थोडी सुधारणा झाली आणि किंमत 50025 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. तर चांदीचा दर 392 रुपयांनी घसरला असून भाव 52,754 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold Price Today

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,430 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,650 रुपये

मुंबई
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,620 रुपये

नागपूर
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,430 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,650 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. Gold Rate Today आपल्याला हे माहिती हवे कि 22 कॅरेट सोन्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यास नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

 

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या (Gold Price Today) वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

हे पण वाचा : 

LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लॅन, त्याविषयी जाणून घ्या

EPFO : पीएफचे पैसे जमा झाले नसतील तर अशा प्रकारे करा तक्रार !!!

Hallmarking of Gold : सोन्याच्या हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश !!!

Canara Bank चा ग्राहकांना धक्का, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

Bank FD : फिक्स्ड रेट किंवा फ्लोटिंग रेट यापैकी कोणत्या FD मध्ये जास्त रिटर्न मिळेल ते समजून घ्या