Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदी स्वस्त; आजचे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) चढउतार पाहायला मिळत आहे. आज बुधवारी 10 मे 2023 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरात मात्र काही प्रमाणात घसरण सुरु आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा व्यवहार 280 रुपये महाग प्रति 10 ग्रॅम ने सुरु झाला तर चांदी 100 रुपये प्रति किलो स्वस्त दराने उघडली. सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 62,280 रुपये होता. उत्पादन शुल्क, राज्यांचा कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 56,950 रुपये
पुणे – 56,950 रुपये
नागपूर – 56,950 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 62,130 रुपये
पुणे – 62,130 रुपये
नागपूर – 62,130 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.