Gold Price Today : सलग तिसऱ्या दिवशी सोने- चांदीच्या किंमतीत कमालीची घसरण; जाणून घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | सध्या सराफ बाजारात सोने चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. गेल्या जुलै महिन्यापासून सोने चांदीच्या किमती बाजारात उतरल्या आहेत. मुख्य म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या – चांदीच्या किमतीत सतत बदल होत असल्यामुळे याचा परिणाम स्थानिक पातळीवर होत आहे. आज सलग दोन दिवस सराफ बाजारातील सोने चांदीचे भाव स्थिर राहिले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सराफ बाजारात आज(सोमवारी) सोने- चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहिला मिळत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

MCX वेबसाईट सोमवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅमने 55,400 रुपये असा सुरू आहे. तर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,440 रूपयांनी व्यवहार करत असल्याचे दिसत आहे. तसेच गुडरिटर्न्सनुसार, सोमवारी सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,650 रूपयांनी सुरू आहे. त्याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,620 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोने 50 रुपयांनी तर 24 कॅरेट सोने 110 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Gold Price Today
Gold Price Today

तर दुसऱ्या बाजूला सोमवारी चांदीच्या किमतीत देखील शनिवारनंतर कोणताही बदल झालेला नाही. सोमवारी चांदीचे भाव शनिवारप्रमाणे स्थिर आहेत. त्यामुळे मधला एक दिवस वगळता सलग तिसऱ्या दिवशी चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजही 10 ग्रॅम चांदीची किंमत बाजारात 730 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चांदीचे भाव स्थित राहतील अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,650 रुपये
मुंबई – 54,650 रुपये
नागपूर – 54,650 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,620 रूपये
मुंबई – 59,620 रूपये
नागपूर – 59,620 रुपये

दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अनेक सणवार आल्यामुळे सराफ बाजारात सोने खरेदीसाठी (Gold Price Today) गर्दी जमू लागली आहे. या काळात ग्राहक सोन्याची खरेदी जास्त प्रमाणात करत आहेत. मुख्य म्हणजे सध्या सराफ बाजारात देखील सोन्याचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना या काळात सोने खरेदी करणे परवडत आहे. यामुळे दररोज सोने चांदीच्या बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मात्र पुढील सणावारांच्या काळात सोने महागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.