व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : सणासुदीत सोन्याच्या किमती उसळल्या, चांदीत किंचीत घसरण; पहा आजचे भाव

Gold Price Today | सणासुदीच्या काळात आज म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतु चांदीचे भाव किंचित घसरले आहेत. मे जून महिन्यात सोन्या – चांदीच्या भावात सातत्याने चढउतार पाहिला मिळत होते. मात्र ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीचे भाव घसरताना दिसले. आता पुन्हा सप्टेंबर महिन्यात हे भाव वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांसाठी हे भाव परवडण्याच्या बाहेर गेले आहेत.

सोमवारी Good Return वेबसाईटनुसार, सोन्याचे भाव (Gold Price Today) पुन्हा वाढले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 55,050 रुपये इतकाच आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 60,050 रुपये एवढी सुरू आहे. यासोबतच MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 55,050 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,050 रुपये सुरू आहे.

Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,050 रुपये
मुंबई – 55,050 रुपये
नागपूर – 55,050 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 60,050 रूपये
मुंबई – 60,050 रूपये
नागपूर – 60,050 रुपये

Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

गणेशोत्सवाच्या काळात चांदीची मागणी वाढली असताना आज चांदीच्या (Gold Price Today) भावात किंचित घसरण झाली आहे. परंतु ही घसरण ग्राहकांना दिलासा देणारी नाही. सोमवारी, 10 ग्रॅम चांदी 745 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,450 रुपयांनी विकली जात आहे. तसेच 1 हजार ग्रॅम चांदी 74,000 रुपये भावाने सुरू आहे.

प्लॅटिनमच्या आजच्या किंमती

आज सोन्यासोबत प्लॅटिनमच्या किमती देखील वाढल्या आहेत. आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,840 आहे. त्यासोबतच 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,48,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. मौल्यवान धातूंच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत असताना आज प्लॅटिनमच्या किमती देखील वाढलेल्या दिसत आहेत.