Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; आजचे दर काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | सराफ बाजारात सोने चांदीच्या भावात आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे, जून महिन्यानंतर जुलै महिना सोने चांदीच्या भावांसाठी नरमलेला दिसत आहे. या कारणामुळे सराफ बाजारातील देखील गर्दी वाढली आहे. आज म्हणजेच, बुधवारी बाजारात MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,850 रूपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,930 रूपयांनी व्यवहार करत आहे.

तर गुड रिटन्सनुसार, बुधवारी (2 August) सोन्याचे भाव (Gold Price Today) घसरलेले दिसत असून सध्या बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,100 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,110 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे, कालच्या दरानुसार 22 कॅरेट सोन्याच्या भावात 300 तर 24 कॅरेट सोन्याच्या भावात 330 रुपयांचा असा समान फरक पडला आहे. सोन्यात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. (Gold Price Today)

Gold Price Today
Gold Price Today

दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीमध्ये ही तेजी दिसत असताना बाजारात चांदी देखील नरमलेली दिसत आहे. बाजारात चांदीचे भाव बुधवारी किंचित घसरले आहेत. आज बाजारात चांदी 10 ग्रॅम भावासाठी 773 रुपयांनी विकली जात आहे. तर 100 ग्रॅम भावासाठी चांदी 7,730 रुपयांनी सुरू आहे. मंगळवारी 10 ग्रॅम चांदी 780 रुपयांनी विकली जात होती.

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे– 55,100 रुपये
मुंबई – 55,100 रुपये
नागपूर – 55,100 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे– 60,110 रूपये
मुंबई – 60,110 रूपये
नागपूर – 60,110 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सराफ बाजारात सोन्याच्या शुद्धतेमध्ये मोठी फसवणूक केल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी यावर उपाय म्हणून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतो. या ॲपद्वारे आपण सोन्याची शुद्धता पासून त्याबाबत तक्रार देखील नोंदवू शकतो. या ॲपमुळे सोन्याच्या शुद्धतेबाबत करण्यात आलेल्या फसवणुकीवर आळा बसल्यास मदत होते.