Gold Price Today : सोन्याला उतरली कळा, चांदीचे भाव मात्र गगनाला; जाणून घ्या आजच्या किमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | आज (शनिवारी) सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. आजच्या सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस होणे खरेदी करण्यासाठी योग्य असला तरी चांदी खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांना भाव कमी होण्याची वाट बघावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे आज चांदीच्या भावात वाढ झालेली दिसत आहे. तर याचबरोबर सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.

शनिवारी MCX वेबसाईटवर सोन्याचा बाजार भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅमने 54,940 रुपयेच असा सुरू आहे. यासोबत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,930 रूपयांनी व्यवहार करत आहे. मात्र गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या किमती स्थिर आहेत. शनिवारी सराफ बाजारात, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,100 रूपयांनीच स्थिर आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,020 रूपयांनी व्यवहार करत आहे. सलग आज तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Gold Price Today
Gold Price Today

 गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,100 रुपये
मुंबई – 54,100 रुपये
नागपूर – 54,100 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,020 रूपये
मुंबई – 59,020 रूपये
नागपूर – 59,020 रुपये

शनिवारी मौल्यवान चांदीचा बाजार भाव वाढला आहे. सोन्याच्या किमती (Gold Price Today) स्थिर असल्या तरी चांदीत मोठा फरक पडला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चांदी खरेदीदारांना चांगली रक्कम मोजावी लागणार आहे. शनिवारी बाजारात, 10 ग्रॅम चांदीची किंमत 767 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,670 रुपयांनी व्यवहार करत आहे. कालच्या भावानुसार, आज 10 ग्रॅम चांदीमध्ये 32 रुपयांचा तर 100 ग्रॅम चांदीत 320 रुपयांचा फरक पडला आहे.

Gold Price Today
Gold Price Today

दरम्यान, ग्राहकांनाही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, सोने चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क आकारले जात नाही. फक्त सराफ बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होतो. यामुळेच या मौल्यवान धातूंच्या किमतीत तफावत दिसून येते. तसेच ज्वेलरी डिझाईन करण्यात आल्यामुळे त्यावर मेकिंग चार्जेस लावले जातात. जितकी आकर्षक नाजूक डिझाईन करण्यात येते तसेच शुल्क ग्राहकांकडून आकारले जाते.