Gold Price Today : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने- चांदीच्या किंमतीत मोठा बदल; पहा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या अक्षय्य तृतीया असून अनेक ग्राहक सोने खरेदीसाठी आतुर असतील. तत्पूर्वी भारतीय बाजारात आज सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा भाव आज थोड्या घसरणीसह 60,381 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला. यानंतर यामध्ये सुरुवातील काही प्रमाणात वाढ दिसली मात्र त्यानंतर 11 वाजेपर्यंत 0.10 टक्क्यांनी म्हणजेच 61 रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव 60,442 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. आज चांदीच्या किमतीत 0.21 टक्के म्हणजेच 156 रुपयांनी घसरण पाहायला मिळत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 56,050 रुपये
पुणे – 56,050 रुपये
नागपूर – 56,050 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 61,150 रुपये
पुणे – 61,150 रुपये
नागपूर – 61,150 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते-

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.