Gold Price Today : सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या; आजचे दर इथे चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. त्यातच सध्याचा काळ हा लग्नसराईतचा आहे, अशावेळी सोन्याचे दर गगनाला भिडल्याने खरेदीदारांच्या खिशाला चाप लागला आहे. आज गुरुवार २१ मार्चला १० ग्राम २४ सोन्याने ६६,६५० रुपयांची विक्रमी उंची गाठली आहे. तर चांदीची किंमत प्रति किलो ७८, ५०० रुपये झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

MCX वर आज सकाळी ९ वाजता २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा व्यवहार ६६,४४० रुपयांपासून सुरु झाला. त्यानंतर सोन्याची किंमत (Gold Price Today) वाढतच चालली. ११ वाजून ७ मिनिटांनी १ तोळा सोन्याचा भाव ६६,५७८ रुपयांवर गेला. त्यानंतर ११ वाजुंन ४० मिनिटांनी हाच दर ६६,६५० रुपयांवर गेला. काही वेळातच त्यामध्ये थोडीशी घट पाहायला मिळाली. सध्या सोने ६६,६२७ रुपयांवर व्यवहार करत आहे.

Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,800 रुपये
मुंबई – 61,800 रुपये
नागपूर – 61,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 67,420 रूपये
मुंबई – 67,420 रूपये
नागपूर – 67,420 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.