Gold Price Today: सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या, तर चांदीच्या दरात मात्र घसरण; जाणून घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today |  सोने चांदीच्या भावांमध्ये रोज चढउतार पाहायला मिळत आहेत. आज (सोमवारी) पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीचे दर खाली घसरले आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 54,468 रुपये असा आहे. तर 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम 59,420 रूपये आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती पुन्हा उंचवल्याच्या दिसत आहेत. मागील वेळी सोन्याचे (Gold Price Today) भाव कमी झाल्याचे पाहिला मिळाले होते. दुसऱ्या बाजूला भारतीय बाजारात चांदी 74,740 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील वेळी चांदीची  किंमत 74,990 रुपये प्रति किलो अशी सुरू होती. त्यामुळे आजचे भाव पाहता चांदीच्या भावात घसरण झालेली पाहिला मिळत आहे.

Gold Price

गुडरिटर्न वेबसाईटनुसार, सोन्याच्या किमती खालीलप्रमाणे – (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,150 रुपये
मुंबई – 55,150 रुपये
नागपूर – 55,150 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 60,160 रुपये
मुंबई – 60,160 रूपये
नागपूर – 60,160 रुपये

Gold Price Today

चांदीचे भाव

भारतीय बाजारात  चांदीचे भाव आज कमी झालेले पाहिला मिळाले आहेत. बाजारात आज चांदी 74846 प्रति 1 किलोग्रॅम अशी विकली जात आहे. गेल्या आठवडयात चांदीचा भाव 75489  रुपये प्रति किलो असा होता. तर जागतिक बाजारात चांदी 24.82  डॉलर प्रति औंस व्यापार करत होती. त्यानंतर आज चांदीच्या (Gold Price Today) भावात देखील घसरण झाली आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी? 

सराफ बाजारात  सोन्याच्या शुद्धतेमध्ये मोठी फसवणूक केल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी यावर उपाय म्हणून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतो. या ॲपद्वारे आपण सोन्याची शुद्धता पासून त्याबाबत तक्रार देखील नोंदवू शकतो. या ॲपमुळे सोन्याच्या शुद्धतेबाबत करण्यात आलेल्या फसवणुकीवर आळा बसल्यास मदत होते.