Gold Price Today : सोने- चांदीच्या किमती पुन्हा महागल्या; आजचे भाव इथे चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र लग्नसराईतचा काळ असून सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) गगनाला भिडल्या आहेत. काल सोन्याच्या किमतीत थोडीफार घट झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला होता, मात्र आता २४ तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा सोने-चांदीच्या किंरी वाढलेल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज १० ग्राम २४ कॅरेट सोने 71958 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.32% म्हणजेच 233 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.

MCX आज सकाळी ९ वाजता सोन्याचा भाव ७१८०० रुपयांनी सुरु झाला. मार्केट सुरु होताच या किमतीत वाढ (Gold Price Today) होताना पाहायला मिळाली. ११ वाजून ३० मिनिटांनी सोन्याच्या किमतीने ७१९८८ रुपयांचा उच्चांक गाठला आहे. यानंतर थोड्या फरकाने सोन्याचा भाव उतरला असून सध्या १ तोळा सोने ७१९०० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाट नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ७२२७१ रुपये आहे तर १ किलो चांदीची किंमत ८४५०० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,600 रुपये
मुंबई – 66,600 रुपये
नागपूर – 66,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,650 रूपये
मुंबई – 72,650 रूपये
नागपूर – 72,650 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? Gold Price Today

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.