Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच; सोने- चांदीच्या आजच्या किंमती किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today : या ऑगस्ट महिन्यात अनेक सणवार आपल्यामुळे सराफ बाजारात लखलखाट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या काळात सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांची जास्त गर्दी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये अनेक नवीन डिझाईन्स बाजारात आल्यामुळे महिला वर्ग देखील जास्त प्रमाणात सोने खरेदी करत आहे. मात्र नेमक्या अशा काळातच सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सलग एक महिन्यापासून बाजारातील सोन्याचे भाव उतरलेले नाहीत. आज देखील सोन्याची लखलखाट कायम आहे.

MCX वेबसाईटच्या माहितीनुसार, शनिवारी म्हणजेच आज सोन्याचे भाव (Gold Price Today) वाढले आहेत. 10 ग्रॅम सोने आज 55,220 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव 60,240 रुपये असा सुरू आहे. तर, गुडरिटर्न्सनुसार आज सोन्याच्या किमती स्थिर आहेत. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,500 रूपयांनीच सुरू आहे. त्याचबरोबर , 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,450 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्यानुसार कालच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही.

Gold Price Today
Gold Price Today

गुड रिटर्न नुसार आजचे सोन्याचे भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,500 रुपये
मुंबई – 54,500 रुपये
नागपूर – 54,500 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,450 रूपये
मुंबई – 59,450 रूपये
नागपूर – 59,450 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळखळणारी चांदी आज स्थिर आहे. गुडरिटर्न वेबसाईटनुसार, शनिवारी चांदीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज 10 ग्रॅम चांदी 764 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव, 7,640 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदी 76,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वीच या चांदीमध्ये मोठी वाढ झाली होती. चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे जास्त प्रमाणात सोने खरेदी करण्यात येतं होते.

दरम्यान, आर्थिक बचत करण्यासाठी लोक जास्त प्रमाणात सोने खरेदी (Gold Price Today) करतात. एकदा सोने खरेदी केले की ते त्या माध्यमातून आपल्या पैशांची गुंतवणूक करतात. जर एखादी अडचण आली तर त्यांना हेच सोने त्या काळात वापरता येते. त्यामुळे सोन्याचे भाव वाढल्यानंतर ग्राहक जास्त प्रमाणात सोन्याचे दागिने मोडण्यवर भर देतात. यामुळे त्यांना सोन्याची दुप्पट किंमत मिळते.