Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत चढ- उतार कायम; पहा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today : मागील काही महिन्यांपासून सोने- चांदीच्या किमतीत प्रचंड चढ- उतार पाहायला मिळाले आहेत. लग्नसराईतच्या काळातच किमती वर खाली होत असल्याने ग्राहकांना नेमकं करावं तेच कळेना. आज सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आहे. MCX वर २४ कॅरेट १० ग्राम सोने सध्या ६६००९ रुपयांवर व्यवहार करत आहे. काल बाजाराच्या अखेरीस हाच दर ६६०२० रुपये होता. म्हणजेच थोडीपार घट आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

MCX वर आज सकाळी ९ वाजता मार्केट सुरु होताच २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६६०२० रुपयांपासून सुरु झाला. त्यानंतर हा दर सुरुवातीला खाली वर जाऊन ६६०६८ वर गेला, त्यानंतर हा दर अचानक खाली जाऊन ६५९८५ वर जाऊन थांबला… नंतर थोड्याच वेळ्यात हाच आकडा किंचित वर जाऊन सोने सध्या ६६००९ वर व्यवहार (Gold Price Today) करत आहे. दर दुसरीकडे गुड रिटर्न नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६७००८ रुपये आहे.

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,350 रुपये
मुंबई – 61,350 रुपये
नागपूर – 61,350 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,930 रूपये
मुंबई – 66,930 रूपये
नागपूर – 66,930 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.