Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आजच्या किंमती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २८ एप्रिल २०२३ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झालेली पहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किमती ६० हजारांच्या खाली दिसत आहेत. सोन्याच्या दरात 75 रुपयांची घट झाली असून प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,830 रुपयांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे चांदी 74,045 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्यांचा कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 55,750 रुपये
पुणे – 55,750 रुपये
नागपूर – 55,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 60,820 रुपये
पुणे – 60,820 रुपये
नागपूर – 60,820 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?-

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते-

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.