Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | सराफ बाजारात आज सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. एक आठवड्यानंतर शुक्रवारी सोने-चांदीचे भाव कमी झाले आहेत. MCX नुसार, आज बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांवर व्यवहार करत होता तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 61,090 रुपये व्यवहार करत होता. यातूनच सोन्याचा भाव (Gold Price Today) आज काही प्रमाणात कमी झाल्याचा दिसून येत आहे. तर गुड रिटन्सनुसार, शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,100 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 60,110 रुपये आहे. त्यामुळे कालच्या दरानुसार 22 कॅरेट सोन्याच्या भावात 350 तर 24 कॅरेट सोन्याच्या भावात 380 रुपयांचा फरक पडला आहे.

Gold Price Today
Gold Price Today

बाजारात सोन्यासोबत चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज बाजारात चांदी 10 ग्रॅम भावासाठी 764 रुपयांनी विकली जात आहे. तर 100 ग्रॅम भावासाठी चांदी 7,640 रुपयांनी सुरू आहे. गुरुवारी बाजारात चांदीचा दर, 10 ग्रॅम भावासाठी 784 रुपये सुरू असा सुरू होता. यामध्ये आता 20 रुपयांचा फरक दिसून आला आहे.

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,100 रुपये
मुंबई – 55,100 रुपये
नागपूर – 55,100 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 60,110 रूपये
मुंबई – 60,110 रूपये
नागपूर – 60,110 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सराफ बाजारात सोन्याच्या शुद्धतेमध्ये मोठी फसवणूक केल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी यावर उपाय म्हणून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतो. या ॲपद्वारे आपण सोन्याची शुद्धता पासून त्याबाबत तक्रार देखील नोंदवू शकतो. या ॲपमुळे सोन्याच्या शुद्धतेबाबत करण्यात आलेल्या फसवणुकीवर आळा बसल्यास मदत होते.