Gold Price Today : ऐन सणासुदीला सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले; आजच्या किंमती पाहून व्हाल थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | श्रावण महिन्यातील रक्षाबंधन सणाला सर्वात जास्त महत्त्व आहे. आज संपूर्ण राज्यात भावा बहिणीच्या या गोड नात्याचा रक्षाबंधन सण अगदी उत्साहात साजरी केला जात आहे. या सणानिमित्त सोने-चांदी बाजारात देखील खरेदीची लगबग सुरू आहे. कोणी आपल्या बहिणीसाठी सोन्याचे कानातले खरेदी करत आहे तर कोणी आपल्या भावासाठी चांदीची राखी घेत आहे. मात्र आज ऐन खरेदीच्या मोक्यावर सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. बुधवारी सोने चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसत आहे.

ऐन रक्षाबंधन सणाला MCX वेबसाईटच्या माहितीनुसार सोन्याच्या किंमती (Gold Price Today) वाढल्या आहेत. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव थेट 55,760 रुपयांवर पोहचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,830 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार बुधवारी, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 55,000 रुपये सुरू आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60 हजार रूपयांनी व्यवहार करत आहे.

 

Gold Price Today
Gold Price Today

 

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,000 रुपये
मुंबई – 55,000 रुपये
नागपूर – 55,000 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 60,000 रूपये
मुंबई – 60,000 रूपये
नागपूर – 60,000 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

सणासुदीच्या काळात सराफ बाजारात चांदीच्या दागिन्यांमध्ये अनेक नवीन व्हरायटी झाले आहेत. त्यामुळे महिला वर्ग चांदीचे कानालते, ब्रेसलेट अशा गोष्टी करण्यावर जास्त भर देत आहे. मात्र या खरेदी दरम्यानच चांदीच्या किमती देखील (Gold Price Today) जास्त वाढल्या आहेत. आज गुडरिटर्न्सनुसार, 10 ग्रॅम चांदी 776 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव, 7,760 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदी 77,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळेच चांदीचे वाढलेले भाव ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेले आहेत.