Gold Price Today : ग्राहकांसाठी गोल्डन चान्स! सोने चांदीच्या किंमतीमध्ये आजही मोठी घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनसह अनेक सण समारंभ आले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील गर्दी देखील वाढताना दिसत आहे. ऑगस्ट महिना सोने चांदी खरेदीसाठी अगदी योग्य असल्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे. कारण, सलग दोन दिवसात सोने चांदीचे भाव घसरलेले दिसत आहेत. आज बाजारात सोने चांदीच्या किमती स्थिर आहेत. MCX नुसार, 22 कॅरेट सोने 10 ग्रॅमने 55,850 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट सोने 10 ग्रॅमने 60,900 रूपयांनी सुरू आहे. त्यामुळे आजच्या भावानुसार, सोन्याच्या दरात तेजी दिसून आलेली नाही.

तर गुड रिटर्न्सनुसार आज सोने चांदीचे भाव (Gold Price Today) स्थिर आहेत. गुरुवारच्या दराप्रमाणे शुक्रवारी देखील सोने-चांदीचे भाव स्थिर आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र जुलै महिन्यात हेच भाव कमी झाल्याचे दिसत आहेत. शुक्रवारी गुड रिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 10 ग्रॅमने रुपये 54,950 असे व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमने भाव 59,950 असा सुरू आहे. कालच्या दरानंतर आज देखील सोन्याच्या दरामध्ये कोणते बदल झालेले नाहीत.

Gold Price Today
Gold Price Today

आपण हे जर चांदीच्या बाबतीत पहायला गेलो तर, चांदीच्या भावात फक्त दोन रुपयांचा फरक पडला आहे. गुड रिटर्न्स नुसार शुक्रवारी बाजारात चांदी, 10 ग्रॅमने 748 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅमने चांदी 7,480 रुपयांनी विकली जात आहे. कालच्या दरानुसार 100 ग्रॅम चांदीमध्ये वीस रुपयांचा फरक पडला आहे. यातूनच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे बदलणारे दर स्थानिक पातळीवर देखील परिणाम करताना दिसत आहेत.

 गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,950 रुपये
मुंबई – 59,950 रुपये
नागपूर – 59,950 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,950 रूपये
मुंबई – 59,950 रूपये
नागपूर – 59,950 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

सोनं कसे खरेदी करावे?

सराफ बाजारात अनेक दुकाने ग्राहकांची फसवणूक करताना दिसतात. सोन्याच्या शुद्धतेत करण्यात आलेली फसवणूक ग्राहकांच्या लवकर लक्षात देखील येत नाही. त्यामुळे सोन्याची गुणवत्ता तपासूनच सोने खरेदी करावे. आपण खरेदी करत असणाऱ्या सोन्यावर हॉलमार्क चे चिन्ह असेल तरच ते खरेदी करावे. सोन्यावर देण्यात आलेले हॉलमार्क ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ठरवते. यातूनच सोन्याच्या गुणवत्तेची हमी थेट सरकार देत असते.