व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : अरे व्वा! आजही सोन्या चांदीच्या किमती उतरल्या; खरेदीची मोठी संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत चाललेल्या महागाईमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता या सोन्या चांदीच्या किमतीत रोज घसरण होत आहे. रक्षाबंधन सणानंतर सोन्या-चांदीचे भाव उतरत चालले आहेत. त्यामुळे या काळात ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ज्या ग्राहकांना लग्न समारंभासाठी किंवा इतर कारणासाठी सोन्याचे दागिने बनवून घ्यायचे आहेत ते ग्राहक या काळात सोन्याची खरेदी करू शकतात. सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना देखील त्या परवडत आहेत.

Good Return वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच गुरुवारी सराफ बाजारातील सोन्याचे भाव (Gold Price Today)  पुन्हा एकदा उतरले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 54,900 रुपये इतका आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 59,890 रुपये एवढी सुरू आहे. त्याचबरोबर, MCX वेबसाईटनुसार पाहिला गेले तर, आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 54,900 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,890 रुपये सुरू आहे. या दोन्ही वेबसाईटनुसार आजच्या सोन्याच्या किमती उतरल्या आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,900 रुपये
मुंबई – 54,900 रुपये
नागपूर – 54,900 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,890 रूपये
मुंबई – 59,890 रूपये
नागपूर – 59,890 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, आज चांदीच्या किमती (Gold Price Today) देखील उतरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता या चांदीत कमालीची घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदी 740 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7400 रुपयांनी विकली जात आहे. त्याचबरोबर, 1000 ग्रॅम चांदी 74,000 रुपये भावाने सुरू आहे. त्यामुळे आजचा दिवस चांदी खरेदी करण्यासाठी देखील योग्य आहे.

प्लॅटिनमची किंमत

आपल्याकडे सोन्या-चांदीसोबत प्लॅटिनमची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे आजचे जर प्लॅटिनमचे भाव बघायला गेलो तर त्यामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,350 रुपये अशी आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,43,500 रुपये सुरू आहे. ज्या ग्राहकांना प्लॅटिनमचे दागिने खरेदी करायचे आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.