Gold Rate Today :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॉरीफ धोरणामुळे सध्या जगभरामध्ये व्यापार युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झालेला दिसून येत आहे. जागतिक परिस्थिती पाहता गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. परिणामी सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत आहे एकाच दिवसात सोन्याच्या किमतीमध्ये शंभर डॉलर्सची वाढ झाली आहे. म्हणजेच 8604 रुपयांची वाढ झाली आहे सोन्याच्या किमतीमध्ये आतापर्यंतची ही एका दिवसातली सगळ्यात मोठी वाढ असल्याचं म्हटलं जात आहे.
गुड रिटर्न्स गोल्ड या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याचे दर काय आहे पाहूया…
24 कॅरेट (Gold Rate Today)
आज दहा ग्रॅम 24 कॅरेटचा दर 93,380 रुपये इतका आहे. हाच दर कारण 90,440 रुपये इतका होता. तर एक ग्रॅम सोनं आज तुम्हाला खरेदी करायचं असेल तर 24 कॅरेट साठी 9338 रुपये द्यावे लागतील.
22 कॅरेट
बावीस कॅरेट सोनं म्हणजेच ज्या सोन्यामध्ये दागिने घडवले जातात अशा 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव दहा ग्रॅम साठी ८५६०० रुपये इतका आहे. हाच दर काल ८२९०० रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 2700 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. तर आज 1 g 22 कॅरेट सोनं खरेदी करायचं असल्यास 8560 रुपये मोजावे लागणार आहेत.
सोन्याच्या दर वाढीमागचं कारण (Gold Rate Today)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर अनेक देशांवरील आयात कर तात्पुरते थांबवले आहेत पण चीन वरचा आयात कर तब्बल 125 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. या दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाची भीती सध्या दिसते आहे म्हणूनच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक मालमत्तेकडे वळत आहेत. पूर्वपार चाललेल्या परंपरेनुसार सोनं एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं म्हणूनच सध्या गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत गुरुवारी सोन्याच्या किमतीत याच मुळे वाढलेल्या दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता स्पॉट गोल्ड 0.2% वाढ होऊन प्रति औस 3,089.17 डॉलर वर पोहोचला आहे जेव्हा जेव्हा जगात तणावजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा लोक सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करणे पसंत करतात विशेष म्हणजे सलग पाच दिवस घसरणीचा सामना केल्यानंतर आज सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेले (Gold Rate Today) दिसत आहे.




