Gold Rate Today : चढ की उतार काय आहे आजचा सोन्याचा भाव ? जाणून घ्यामागच्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी रशिया आणि युक्रेन या दोन देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढताना दिसत होते आणि आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद ट्रम्प यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सोन्याच्या धोरणात केलेल्या बदलामुळे सोने सतत वाढत असताना दिसत आहे. याशिवाय (Gold Rate Today) डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन हे देखील सोन्याच्या दराच्या वाढीचे एक कारण आहे. असं मानलं जात आहे. चला आज सोन्याचा दर वाढला आहे की कमी झालाय हे पाहुयात.
24 कॅरेट (Gold Rate Today)
एक ग्राम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 8705 रुपये इतका आहे. हाच दर काल 8667 रुपये इतका होता. म्हणजेच आज 1 ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 38 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 87 हजार 50 रुपये इतका आहे. हाच दर काल 86,670 रुपये इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 380 रुपयांची वाढ झाली आहे.
22 कॅरेट (Gold Rate Today)
22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा भाव सात हजार 980 रुपये इतका आहे हाच दरकाल 7940 रुपये इतका होता म्हणजेच आज एक ग्राम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव 79,800 रुपये इतका आहे हाच दर काल 19 हजार चारशे रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्राम सोन्याच्या दरामध्ये (Gold Rate Today) चारशे रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीचा दर
तर आजच्या चांदीच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज दहा ग्रॅम चांदीची किंमत 995 रुपये इतकी आहे आणि 100 ग्रॅम चांदीचा रेट 9950 रुपयांवर आला आहे तर एक किलो चांदीचा आजचा भाव 99 हजार पाचशे रुपये (Gold Rate Today) इतका आहे