Gold Rate Today : सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे दर सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. काही दिवसांपासून सोन्याच्या दराबद्दल अनेक चर्चा ऐकू येत आहेत. सोनं 55000 पर्यंत खाली येणार असा अंदाजही परदेशातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र सोन्याच्या दरात कोणता बदल आज झालेला आहे ?आज सोन्याचा दर वाढला की कमी झालाय चला पाहूयायात…
24 कॅरेट (Gold Rate Today)
आजच्या दिवशी सोने खरेदीदारांसाठी एक चांगली बातमी आहे कारण आज सोन्याच्या दरामध्ये काहीशी घट झाली आहे. गुड रिटर्न्स गोल्ड या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर पाहिल्यास 24 कॅरेट सोन्याचा आजचा दहा ग्रॅम साठी चा भाव हा 95 हजार 510 इतका आहे. हाच दर काल 95 हजार 670 रुपये इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 160 रुपयांची घसरण झाली आहे.
22 कॅरेट (Gold Rate Today)
तर 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 8750 रुपये इतका आहे हाच दरकाल 87 हजार 700 रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 150 रुपयांची घट झाली आहे.
सोन्याच्या दर वाढीमागचं कारण (Gold Rate Today)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर अनेक देशांवरील आयात कर तात्पुरते थांबवले आहेत पण चीन वरचा आयात कर तब्बल 125 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. या दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाची भीती सध्या दिसते आहे म्हणूनच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक मालमत्तेकडे (Gold Rate Today) वळत आहेत. पूर्वपार चाललेल्या परंपरेनुसार सोनं एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं म्हणूनच सध्या गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत गुरुवारी सोन्याच्या किमतीत याच मुळे वाढलेल्या दिसत आहेत.




