Gold Rate Today :सोन्याच्या दर वाढीला ब्रेक! आज पुन्हा घसरला सोन्याचा भाव ; जाणून घ्या

gold rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate Today : सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाली होती त्यानंतर आज मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी देखील सोन्याच्या दरामध्ये घट झालेली दिसून येत आहे. दुसरीकडे जागतिक स्तरावर बाजारामध्ये अस्थिरता असल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर दिसून येतो आहे. महाराष्ट्र मध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत आता पाहूयात…

24 कॅरेट (Gold Rate Today)

24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याचा दर पाहिला असता आज दहा ग्रॅम साठी 95 हजार 180 रुपये मोजावे लागतील. हाच दरकाल 95 हजार 510 रुपये इतका होता म्हणजेच आज 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 330 रुपयांची घसरण झाली आहे. जर एक ग्रॅम 24 कॅरेट सोने तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्याचा आजचा दर 9518 इतका आहे.

22 कॅरेट (Gold Rate Today)

दुसरीकडे ज्या सोन्यामध्ये दागिने घडवले जातात अशा 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 87 हजार दोनशे रुपये इतका आहे. हाच दरकाल 87 हजार 550 रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 350 रुपयांची घसरण झाली आहे. तर एक ग्राम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 8720 इतका आहे.

चांदी भाव

चांदीच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज मंगळवार दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी चांदीचा भाव 998 प्रति किलो झाला आहे. कालच्या भावाच्या तुलनेत आज चांदीच्या दारातही शंभर रुपयांची घट झालेली दिसून येत आहे.