Gold Rate Today: मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे दर (Gold Rate Today) उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर सोन्याच्या दराला जी चढती लागली आहे त्यानंतर आत्तापर्यंत सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहेत. आता अमेरिका आणि चीन यांच्या मधल्या टॉरीफ वॉर चा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. आजच्या दिवशीच सोन्याचा काय भाव आहे ? आज 22 आणि 24 कॅरेट साठी किती रुपये मोजावे लागतील चला जाणून घेऊयात
24 कॅरेट (Gold Rate Today)
आजचा सोन्याचा दर पाहिला तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा प्रतिदहा ग्रामचा दर हा तब्बल 97 हजार 310 इतका आहे. हा दर उच्चांकी दर मानला जात आहे. काल हाच दर 96 हजार 170 रुपये इतका होता म्हणजेच आज 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 1140 रुपयांची मोठी वाढ झाली आहे.
22 कॅरेट (Gold Rate Today)
22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रामचा दर 89200 इतका आहे. हाच दर काल 88 हजार 150 रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 1050 रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्याचा दर घसरण्याचे भाकीत
यापूर्वी अमेरिकेतल्या तज्ञांनी सोन्याचा दर पुढच्या तीन वर्षांमध्ये अगदी 55 हजार रुपयांपर्यंत खाली येणार असं भाकित केलं होतं. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना चिंताग्रस्त करून सोडलं होतं. मात्र सध्याचे सोन्याचे दर पाहता हे काही साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे तुम्ही जर सोनं गुंतवणूक म्हणून खरेदी करणार असाल तर पुन्हा एकदा विचार करा.




