सलग दुसऱ्या दिवशी वाढला सोन्याचा दर ; पहा 22, 24 आणि 18 कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागतील ?

gold rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण झाल्यानंर कालपासून म्हणजेच 18 नोव्हेम्बर पासून पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून आज प्रति 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 7600 रुपयांनी वाढला असून त्यानंतर त्याची किंमत 7,72,200 रुपये झाली आहे. त्याच वेळी, प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 760 रुपयांनी महागून 77,220 रुपयांवर पोहोचला आहे.

आता आजचे पुण्यातील सोन्याचे दर पाहुया आज तुम्हाला 22 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर त्यासाठी एक ग्राम करिता 75 रुपये मोजावे लागतील. काल हीच सोन्याची किंमत 6995 रुपये इतकी होती त्यामुळे आज सोन्याच्या दरामध्ये 70 रुपयांची वाढ झाली आहे तर आज तुम्हाला 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने खरेदी करायचं असेल तर त्यासाठी 700650 रुपये मोजावे लागतील काल हाच दर 69,950 रुपये इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये तब्बल 700 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुण्यामध्ये सोन्याचा दर काय आहे चला पाहुयात …

24 कॅरेट

24 कॅरेट सोन्याच्या दाराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7707 रुपये इतका आहे. हाच दर काल 7631 रुपये होता आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 76 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 70 रुपये इतका आहे. हाच दरकाल 76 हजार 310 रुपये इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 760 रुपयांची वाढ झाली आहे.

18 कॅरेट

18 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 5781 रुपये इतका आहे. तर दहा ग्रॅम 18 कॅरेट सोनं तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 57810 रुपये मोजावे लागतील