सोन्याला झळाळी ! वाढला भाव, पहा आज काय आहेत सोन्याचे 22 आणि 24 कॅरेटचे दर

gold rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दारात भारी वाढ झालेली दिसून येत आहे. एकीकडे लग्नसराई सुरु झाली असताना सोन्याचे वाढते दर ग्राहकांची चिंता वाढवणारे आहेत. आज पुण्यामध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दारात 870 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 78,820 वर जाऊन पोहचला आहे. चला तर मग पाहुयात सोन्याचे आजचे(२२-११-२४) भाव सविस्तर

22 कॅरेट

आज एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर 7225 रुपये इतका आहे. हाच दर काल 7145 रुपये इतका होता. म्हणजेच आज एक ग्राम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 80 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 72 हजार 250 रुपये इतका आहे. हाच दर काल 71 हजार 450 रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट १० ग्राम सोन्याच्या दरामध्ये आठशे रुपयांची वाढ झाली आहे.

24 कॅरेट

24 कॅरेट म्हणजे शुद्ध सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 7882 रुपये इतका आहे. हा दर काल 7795 रुपये इतका होता म्हणजेच आज 24 कॅरेट एक ग्राम सोन्याच्या दरामध्ये 87 रुपयांची वाढ झाली आहे. तर दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 78 हजार 820 रुपये इतका आहे. हाच दरकाल 77 हजार 950 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दारामध्ये 870 रुपयांची वाढ झाली आहे.