Gold Rate Today : गेल्या एका महिन्यात संपूर्ण जगभरात सोने आणि चांदीच्या बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळाली आहे. भारतातही सोन्या-चांदीच्या किंमती दररोज बदलताना दिसत आहेत. मागील १० दिवसांमध्ये ४ वेळा सोन्याच्या किंमतीत (Gold Rate Today) घसरण झाली होती. मात्र आता, एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात सोने आणि चांदी पुन्हा विक्रमी पातळी गाठण्याच्या मार्गावर आहेत.
आजचे सोन्याचे भाव ? (Gold Rate Today)
दरम्यान पुणे मुंबई मध्ये आजचा सोन्याचा दर पाहिला तर 24 कॅरेट साठी प्रति दहा ग्राम 97 हजार 970 रुपये आज मोजावे लागतील. आज सोन्याच्या दहा ग्रॅम 24 कॅरेटच्या दरामध्ये 440 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 89 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम साठी आहे. 22 कॅरेट सोन्याचा प्रतिदहा ग्राम चा कालचा दर 89400 होता आज त्यामध्ये चारशे रुपयांची (Gold Rate Today) वाढ झाली आहे.
भारतातील चांदीचा आजचा दर (Gold Rate Today)
आज: ₹९७,०९० प्रति किलो
काल: ₹९६,४१० प्रति किलो
सोनं विकत घेताना ‘हॉलमार्क’ तपासा (Gold Rate Today)
जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी.
जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.




