Gold Rate Today : नवीन वर्षात सोन्याच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे सोन्याचे भाव

gold rate today 7
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate Today : पिढ्यानपिढ्या चालत आलेली विश्वासू आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक (gold investment) म्हणून सोन्याचं नाव (Gold Rate Today)आवर्जून घेतलं जातं. सध्याचा सोन्याच्या दराचा विचार करता सोने खरेदी म्हणजे काही सर्वसामान्यांना परवडणारी बाब राहिली नाही. मात्र तरी देखील भविष्यकालीन गुंतवणूक, आभूषणे म्हणून सोने खरेदीमधला ग्राहकांचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाही. सध्या लग्न साराई सुरु असल्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांचीही वर्दळ दिसून येते. तुम्ही सुद्धा आज सोने खरेदीचा विचार करीत असला तर चला जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव …

नवीन वर्षात सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. आज मंगळवारी दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी देखील सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. सोमवारच्या तुलनेत आज सोन्याच्या दरामध्ये जवळपास शंभर रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 24 कॅरेट गोल्ड रेट 78 हजार 800 रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate Today) 72 हजार 300 रुपयांच्या आसपास ट्रेड करतो आहे.

चांदीचा दर (Silver Rate)

चांदीच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास देशांमध्ये एक किलो चांदीचा दर 91, 500 रुपये इतका आहे चांदीच्या भावात देखील वाढ होताना दिसत आहे यापूर्वी चांदीचा दर 90 हजार पाचशे रुपये इतका होता आता यात वाढ होऊन हा दर 91 हजार पाचशे रुपयांवर पोहोचला आहे.

आज महाराष्ट्रामध्ये सोन्याचा खरेदी तुम्हाला करायचे असेल तर 24 कॅरेट आणि 22 कॅरेट साठी प्रति ग्रॅम किंवा दहा ग्राम साठी किती रुपये मोजावे लागतील हे जाणून घेऊयात..

24 कॅरेट (Gold Rate Today)

शुद्ध सोनं म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा आजचा एक ग्रॅमसाठीचा दर 7,871 रुपये इतका आहे. तर आज तुम्हाला 10 ग्रॅम शुद्ध सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठी 78 हजार 710 रुपये मोजावे लागतील.

22 कॅरेट

22 कॅरेट सोनं म्हणजेच ज्यामध्ये अलंकार घडवले जातात अशा सोन्याचा आजचा एक ग्रॅमचा भाव 7 215 रुपये इतका आहे. तर दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 72 हजार 150 रुपये इतका आहे.

नव्या वर्षात वाढला सोन्याचा भाव (Gold Rate Today)

यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जर आपण 31 डिसेंबर 2024 चा सोन्याचा दर पाहिला तर 22 कॅरेट साठी 7110 मोजावे लागत होते. म्हणजेच 40 रुपयांनी आजच्या तुलनेत सोन्याचा दर कमी होता. तर 24 कॅरेट सोन्याच्या बद्दल सांगायचं झाल्यास 31 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 756 रुपये इतका होता. म्हणजेच आजच्या दराच्या तुलनेत 44 रुपयांनी सोनं स्वस्त होतं. मात्र नव्या वर्षांमध्ये सोन्याचा दर वाढत गेलेला दिसून येत आहे.

सोने दराच्या वाढीचे कारण

  • सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याचा एक मुख्य कारण तज्ञांकडून सांगितलं जात ते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मजबुती आणि देशांमध्ये वाढती सोन्याची गुंतवणूक.
  • दुसरे आणखी एक कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी असणे हे सोन्याच्या दरवाढीचे देखील मोठं कारण आहे.
  • जगभरात असलेली आर्थिक अनिश्चितता लक्षात घेऊन लोकांचा कल हा सोने खरेदी कडे वाढताना दिसतो आहे. याशिवाय अमेरिकेच्या आर्थिक आकड्यांवर जर नजर टाकली तर बेरोजगारीचा दर, पी एम आय रिपोर्ट याच्यावर सोन्याच्या दरामध्ये चढ उतार होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.