Gold Rate Today : सोन्याचे दर आत्ताच सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर पोहोचले आहेत. यातच उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये सोन्याबाबत दिलासा मिळणार की सोन(Gold Rate Today) आणखी महाग होणार ? हे आता उद्याच कळेल. मात्र तज्ञांच्या म्हणण्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन गोल्ड वर इम्पोर्ट ड्युटी वाढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारी नंतर कदाचित सोन्यायाचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. तत्पूर्वी जर तुम्ही सोनं आज खरेदी करू इच्छित असाल तर आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा काय दर आहे पाहुयात.
24 कॅरेट
24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 8,433 रुपये आहे. हाच दर काल 8302 रुपये इतका होता. म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 131 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 84 हजार 330 रुपये इतका आहे.
22 कॅरेट (Gold Rate Today)
22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 7730 रुपये इतका आहे. हाच दर काल 7610 इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरेट एक ग्राम सोन्याच्या दरामध्ये 120 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा दर 77,300 रुपये इतका आहे. हाच दर काल 76,100 इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये एक हजार दोनशे (Gold Rate Today) रुपयांची वाढ झाली आहे.
2023 मध्ये सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी घटवली
दरम्यान सोन्याचा दर हा सतत वाढत असताना उद्या एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2023 -24 च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीच्या दरातील इम्पोर्ट ड्युटी ही 15 टक्क्यांवरून सहा टक्के केली होती. यापूर्वी कधीच इतक्या मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट ड्युटी मध्ये घट करण्यात आली नव्हती. 2023 मध्ये पहिल्यांदा गोल्ड मधील इम्पोर्ट ड्युटी तब्बल दहा टक्क्यांनी खाली आली होती. याचा थेट परिणाम सोन्याच्या इम्पोर्ट वर झालेला पाहायला मिळाला. अशातच आता सध्याच्या घडीला सोन्याचा दर उच्चांकी गाठत असताना अर्थसंकल्पात नेमकं सोन्याच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वसामान्य माणसाचा लक्ष लागून राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं उचचांकी दरावर (Gold Rate Today)
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दर 1.1 टक्क्यांनी वाढला आहे. तो 2790 डॉलर प्रतिउस वर जाऊन पोहोचला आहे. ही सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सर्वाधिक किंमत आहे. भारताच्या बाबतीत सांगायचं झाल्यास 30 जानेवारी रोजी पहिल्यांदा सोन्याचा भाव हा प्रति दहा ग्रॅम साठी 81 हजारांवर जाऊन पोहोचला होता. त्यानंतर हा दर सतत वाढतानाच दिसतो आहे.