Gold Rate Today : सोनं वाढलं ! आज 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम साठी मोजावे लागतील 80 हजार

gold rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate Today : मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. 2025 या नव्या वर्षात देखील सोन्याच्या दराबाबत दिलासा मिळालेला नसून सोन्याचे दर चढेच आहेत. सध्या लग्नसराई चालू असल्यामुळे सोन्याची खरेदी केली जाते. मात्र आज जर सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमावर दिनांक १३ जानेवारी राजी सोन्याच्या दरात कोणता बदल झाला आहे ? सोने वाढले की कमी झाले ? (Gold Rate Today) चला जाणून घेउया…

24 कॅरेट (Gold Rate Today)

आज दिनांक 13 जानेवारी रोजी सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत असून 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोनं हे प्रती 10 ग्रॅम 80 हजारांवर जाऊन पोहोचले आहे. आज एक ग्राम 24 कॅरेट सोन्याचा भाव 8007 रुपये इतका आहे. हाच दर काल 7964 इतका होता म्हणजेच आज 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 43 रुपयांची वाढ झाली आहे.

22 कॅरेट (Gold Rate Today)

22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 7340 रुपये इतका आहे. हाच दर काल 7300 इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याच्या दरात 40 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 73,400 इतका असून हाच दरकाल 73 हजार रुपये इतका होता म्हणजेच दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये (Gold Rate Today) आज चारशे रुपयांची वाढ झाली आहे.

चांदी दर

आज 13 जानेवारीला चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 945 रुपये आहे. याशिवाय 100 ग्रॅम चांदीचा भाव 100 रुपयांनी वाढून 9,450 रुपयांवर पोहोचला आहे.आज 1 किलो चांदीचा भाव 1000 रुपयांनी वाढून 94,500 रुपये झाला आहे. त्याचवेळी 10 जानेवारीला चांदीच्या दरात वाढ झाली होती.यापूर्वी 11 आणि 12 जानेवारीला चांदीच्या दरात बदल झाला नव्हता. याशिवाय 10 जानेवारी आणि 7 जानेवारीला चांदीच्या दरात वाढ झाली होती. याशिवाय 10 जानेवारी आणि 7 जानेवारीला चांदीच्या दरात वाढ झाली होती. त्याच वेळी, 9 आणि 8 जानेवारी रोजी चांदीच्या किमतीत (Gold Rate Today) बदल झाला नाही.