Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण ; पहा आज 24 कॅरेट साठी किती रूपये मोजावे लागतील ?

Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate Today : रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाने अनेक जागतिक घडामोडींवर परिणाम झालेला पाहायला मिळाला. त्यापैकी सर्वात मोठा परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून सोन्याच्या किमती झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. सोन्याचे दर तेव्हापासून सतत वाढतं दिसत आहेत. त्यानंतर टॅरिफ वॉर , भारत -पाक तणाव याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर होत चालले आहे. अशा स्थितीत आज काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

15 मे 2025 रोजी देशातील सोन्याच्या दरात मोठी घसरण (Gold Rate Today) झाली असून, हे दर मागील काही दिवसांतील सर्वात कमी स्तरावर पोहोचले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चढत्या बाजारभावामुळे सोन्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका दिला होता. पण आज झालेल्या दरघटीनं लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बाजारात 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,500 ते 2,100 रुपयांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे.

टॅरिफ वॉरचा परिणाम (Gold Rate Today)

ही दरघट मुख्यत्वे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धात सौम्यता येण्याच्या संकेतांमुळे घडली आहे. या दोन महाशक्तींमधील टॅरिफ वॉरमुळे मागील काही काळात जागतिक बाजारात अनिश्चितता होती. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वळलेले गुंतवणूकदार भाववाढीला जबाबदार होते. मात्र, आता ही परिस्थिती बदलताना दिसत आहे आणि त्यामुळेच सोन्याचे दर खाली आले आहेत.

22 आणि 24 कॅरेटचे दर

आज देशात 22 कॅरेट सोन्याचा दर 86,100 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे, जो कालच्या तुलनेत 1,950 रुपयांनी कमी आहे. 24 कॅरेट सोनं 2,130 रुपयांनी स्वस्त होत 93,930 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याचा दर 70,450 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका असून, त्यात 1,590 रुपयांची घसरण झाली आहे. याशिवाय 1 ग्रॅम, 8 ग्रॅम अशा विविध प्रमाणात सोन्याचे दरही तळाला गेले असून ग्राहकांना आता अधिक चांगल्या दरात खरेदी करता येणार आहे.

मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरी भागात देखील याच दरांची नोंद झाली असून, खरेदीदारांकडून याला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. सोन्याचे हे पडलेले दर केवळ दागिने खरेदीसाठीच नाही, तर सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीही उत्तम संधी देतात.

विशेष म्हणजे, सध्या भारतात विवाहसोहळ्यांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदीकडे असतो. अशा वेळी सोन्याच्या दरात आलेली घट ही सर्वसामान्यांसाठी ‘सुवर्णसंधी’ ठरू शकते. बाजारतज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारात स्थिरता आल्याने हे दर काही काळ स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत योग्य आहे.

संपूर्ण देशात आज सोनं खरेदी करण्याची चलती असून, अनेक ज्वेलर्सकडे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. अशावेळी ही घसरण सोनं खरेदीसाठी योग्य संधी ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी ही संधी साधावी आणि योग्य दरात सोनं खरेदी करून भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.