CIDCO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! 101 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध; लगेच अर्ज करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. सिडकोमध्ये (CIDCO)
सहाय्यक अभियंता या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. सध्या या भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे त्वरित इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांसाठी अर्ज करावा.

राखीव जागा किती?

सिडको महामंडळाच्या (CIDCO) तर्फे एकूण 101 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत, खुल्या प्रवर्गासाठी 38, अनुसूचित जातींसाठी 13, अनुसूचित जमातींसाठी 7, ओबीसींसाठी 19 तर इतर प्रवर्गासाठी 24 जागा राखीव ठेवल्या आहेत.

पात्रता काय असावी?

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदवी प्राप्त असावी. तसेच, SAP ERP प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.

वयोवर्यादा

ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांचे वय 18 जानेवारी 2024 पर्यंत (खुल्या वर्गासाठी) 38 असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे वय 43 वर्षे इतके असावे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. अर्ज केलेल्या उमेदवारांची 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेमध्ये 90 गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरवले जाईल.

अर्ज कसा भरायचा?

या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/ या लिंकवर जाऊन संपूर्ण अर्ज भरावा. अर्ज भरताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1180 शुल्क आकारले जाईल. तर राखीव उमेदवाराकडून 1062 रुपये शुल्क घेण्यात येईल. अर्जाची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.