हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. नुकतीच अंमलबजावणी संचालनालय (ED) ने सिस्टम अॅनालिस्ट आणि सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत अर्ज सादर करावा लागणार आहे.
एकूण 7 पदांसाठी भरती
या भरतीअंतर्गत एकूण 7 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सिस्टम अॅनालिस्ट पदासाठी एक जागा आणि सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट पदासाठी 6 जागा उपलब्ध आहेत.
पात्रता आणि पगार
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. ही पात्रता मूळ जाहिरातीत देण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या सिस्टम अॅनालिस्ट उमेदवाराला मासिक पगार 70,000 रुपये मिळेल. तर सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट उमेदवाराला मासिक पगार 55,000 रुपये दिला जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांनी अर्ज पाठवल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल आणि त्यांना पुढील प्रक्रियेसाठी नोंदणीकृत ईमेलद्वारे माहिती दिली जाणार आहे.
अर्ज कसा करावा?
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून सीलबंद लिफाफ्यात पाठवावा. लिफाफ्यावर अर्ज केलेल्या पदाचे नाव स्पष्टपणे लिहावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
उपसंचालक (प्रशासन),
अतिरिक्त संचालक कार्यालय,
अंमलबजावणी संचालनालय, कोलकाता विभागीय कार्यालय-1,
सीजीओ कॉम्प्लेक्स, तिसरा एमएसओ बिल्डिंग, सहावा मजला,
डीएफ ब्लॉक, सॉल्ट लेक, कोलकाता- 700064.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
ईडीच्या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत अर्ज पाठवावा लागणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित अर्ज करावा.