घरच्यांचा विरोध म्हणून, प्रेमीयुगुलाची आत्महत्या

गोंदिया प्रतिनिधी। गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी नाल्यामध्ये प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रेमीयुगलाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप यशवंत कावळे वय २३ तसेच संगीता बोहारे वय १६ असे दोघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर अशी की, कनेरी नाल्याजवळ प्रचंड दुर्गंध येत असल्याची कुजबुज गावात सुरु असतांना गावकऱ्यांनी त्यांच्या शोध घेतला असता एका युवक-युवतीची प्रेत कुजलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळले. नागरिकांनी लगेचच या घटनेची माहिती दुग्गीपार पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली. सुरुवातीच्या तपासात दोनही मृतदेहाची ओळख पटली असता संदीप आणि संगीता हे दोघे कनेरी येथील रहिवाशी असून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते असे समजले.

समोर आलेल्या माहिती नुसार लग्नाला घरच्यांचा विरोधामुळे आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने ते इतरत्र हलवणे शक्य नव्हते त्यामुळे आहे त्याच ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांच्या समक्ष शिवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेची दुग्गीपर पोलिस स्टेशन मध्ये आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास दुग्गीपर पोलीस करत आहेत.
—————

You might also like