चिंता मिटणार ! 15 जूनपर्यंत केंद्र सरकार पुरवणार 7 कोटी 86 लाख मोफत लसी, संपूर्ण योजना जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : दररोज नव्याने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या जरी कमी होताना दिसून येत असली तरी मृत्युदर मात्र काही कमी होताना चे चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे ही बाब अधिकच चिंता वाढवणारी ठरत आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. लसींच्या वाटपावरून देखील विरोधक केंद्रावर नाराज आहे आणि वारंवार टीकादेखील करत आहेत. मात्र आता केंद्र सरकार राज्य सरकारला 15 जून पर्यंत सात कोटी 86 दाखल होणार आहेत. या लसी राज्य सरकारला मोफत पुरवल्या जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण वाटपाची माहिती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून दिली आहे यामध्ये कॅव्हिडशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींची माहिती आहे. आगाऊ माहितीमुळे राज्य सरकारांना योग्य पद्धतीने नियोजन आता करता येणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात 50% लस्सी केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जातात या लसी राज्यांना विनामूल्य पुरवल्या जातात. उर्वरित 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकार राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना आगाऊ माहिती दिली आहे. 1 मे ते 15 जून पर्यंत पुरवण्यात येणारे पाच कोटी 86 लाख 29 हजार लसीचा डोस राज्यांना मोफत देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त जून अखेर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत कडून थेट खरेदीसाठी एकूण चार कोटी 87 लाख 55 हजार लसी उपलब्ध असतील अशी माहिती उत्पादकांकडून देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारनं काही मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत ती आहे खालील प्रमाणे

जिल्हाभर कोविड लसीकरण केंद्राची स्थापना करण्याच्या सूचना. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माध्यमांचा प्रभावी वापर करणे. राज्य सरकार आणि खासगी रुग्णालय आणि कोरोना लसीकरणाची आगाऊ माहिती कोविंन डिजिटल प्लॅटफॉर्मवर देणे. राज्य आणि खाजगी रुग्णालयांनी प्रत्येक दिवशी केलेल्या लसीकरणाची आकडेवारी देणे बंधनकारक आहे लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नियम पाळावेत कोविंन डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. असा सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment