खुशखबर! पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर सोन्याचा दर पुन्हा वाढला. आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठेतील मंदीमुळे मंगळवारी 20 एप्रिलला भारतातील सोन्याच्या किमती मध्ये घट दिसून आली.मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या भावात 0.29 टक्क्यांनी घसरण झाली आहे सोन्याच्या दरात घट दिसत असताना उलट चांदीमध्ये काहीशी तेजी झाल्याचे दिसत आहेत. चांदीचा दर 0.1 45 टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

सोन्याच्या भावात घसरण

मागील व्यापार सत्रात सोन्याची किंमत वाढून दोन महिन्यांच्या उच्चांकी किमतीवर प्रति 10 ग्रॅम 47 हजार 850 रुपये झाली होती.सोन्याचे भाव मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर 139 रुपयांनी घसरून 47 हजार दोनशे 45 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. मागील सत्रात सोने 47 हजार 850 रुपयांवर पोहोचले होते.

चांदीच्या भावात वाढ

औद्योगिक मागणीत सुधारणा झाल्यामुळे चांदीला सुगीचे दिवस आले आहेत. एमसीएक्स वर मे वायदा चांदीचे दर 225 रुपयांनी वाढून 68 हजार 635 रुपये प्रति किलो वर दर बंद झाले. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात मंदीचं वातावरण आहे. अमेरिकन ट्रेझरी रिबाउंड च्या दरम्यान सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवली गेली. परंतु कमजोर पडलेल्या डॉलर ने ही घसरण काहीशी कमी केली. गेल्या सत्रात प्रति औस 1,789.77 डॉलर वर पोहोचल्यानंतर, स्पॉट गोल्ड आज 0.2 टक्क्यांनी घसरून 1766.32 डॉलर प्रति औस झाले आहे.

सोन्याची किंमत ठरवणाऱ्या घटकांविषयी बोलताना यामध्ये मागणी आणि पुरवठा, रुपये आणि डॉलरचा विनिमय दर आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याची किंमत, महागाई,आयात शुल्क, जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. जीएसटी आणि इतर स्थानिक कर राज्यानुसार बदलू शकतात. काही व्यवसाय संस्था रिझर्व बँकेने दिलेले दरही स्वीकारतात. अलीकडील काळात सोन्याच्या किमतीत लोकांमध्ये चर्चा वाढली आहे. याकडे आता लक्ष वेधले जाऊ शकते.परंतु वेगवेगळ्या दुकानात सोन्याच्या किमती मध्ये फरक ही एक सामान्य बाब आहे.

You might also like