औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे. अनेक दिवसापासून पुतळ्याचे काम रखडले होते मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पुतळ्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाची सुरुवात झाली आहे मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बस विरोध दर्शवला आहे आणि पुतळ्याची दिशा बदलण्याची मागणी केली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या चेहऱ्याच्या दिशा परस्पर विरोधी असल्याने भविष्यात सामाजिक दुहीकरणास वाव मिळेल. म्हणून हे दुहीकरण रोखण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची दिशा बदलण्याची मागणी रिपाइंचे युथचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे. विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व स्मारक विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र उद्यानात उभारण्याचा निर्णय घेतला. सामाजिक समतेचा बंधुत्वाचा संदेश देणारे प्रतीक म्हणून भविष्यात या स्मारकाकडे बघण्याचा बहुजन समाजाचा दृष्टिकोन असणार आहे, परंतु पुतळ्याची दिशा विद्यापीठाने ठरवलेली आहे ती चुकीची असल्याचे नागराज गायकवाड यांचे म्हणणे आहे. याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
अगदी त्याच पुतळ्याच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. दोन्ही महापुरुषाचे चेहरे परस्परविरोधी असल्याने ते संयुक्तिक ठरणार नाही. पुतळा उभारण्यात द्वारे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा जो उद्देश आहे तो सफल होणार नाही. यामध्ये आंबेडकरी समुदायामध्ये विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात भविष्यात कटुता निर्माण होईल. आणि आंबेडकरी समुदायात देखील संतोष निर्माण होईल. या दोन्ही महापुरुषांनी त्यांच्या कार्यकाळातमध्ये जाती निर्मूलनाचे व वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केलेले आहे. त्यामुळे दोन्ही महापुरुषांना परस्परविरोधी दिशेस नवता एकाच दिशेस बसवण्यात यावे.तर डॉ. आंबेडकर हे शिवरायांना गुरु मानत होते, या गुरु शिष्यांना एकाच दिशेत बसवावे आणि भविष्यात समाजात होणारे दुहीकरण टाळावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. तसेच विद्यापीठात शिवरायांचे स्मारक व्हावे यासाठी गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता.
पुतळ्याची दिशा बदलण्याची मागणी
रिपाइं युथचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी पुतळ्याची दिशा बदलण्याची मागणी केली आहे. महापुरुषांचे दिशा एकमेकांच्या विरोधात असल्यास भविष्यात समाजात विरोधाभास निर्माण होईल त्यामुळे दोन्ही पुतळ्याची दिशा एकाच बाजूला ठेवणे योग्य ठरेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व्हावं यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले आहेत. जर पुतळ्याची दिशा बदलली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला आहे.