Jio ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘या’ 6 महिन्याच्या प्लॅनमध्ये मिळणार फ्री OTT आणि 300Mbps पर्यंतचा स्पीड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Recharge Plan : रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी वेळोवेळी प्लॅन ऑफर करत असते. यामध्ये लोकांचे कमी पैशात चांगल्या प्रकारे मनोरंजन होत असते. अशा वेळी तुम्हीही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता जिओने 6 महिन्यासाठी एक नवीन प्लॅन आणला आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्री OTT आणि 300Mbps पर्यंतचा स्पीड मिळणार आहे. तसेच कंपनी अनलिमिटेड डेटासोबत फ्री कॉलिंग देखील देत आहे.

अशा वेळी जर तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट आणि जास्त वेळेसाठी प्लॅनच्या शोधात असाल तर JioFiber चा हा प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदशीर आहे. जर या प्लंबद्दल बोलायचे झाले तर कंपनी या प्लॅनच्या 6 मासिक सबस्क्रिप्शनसह 15 दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300Mbps पर्यंत अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड डेटासोबत फ्री कॉलिंगची सुविधाही देत ​​आहे. विशेष बाब म्हणजे या प्लॅन्समध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, जिओ सिनेमा आणि डिस्ने + हॉटस्टार यांसारख्या अॅप्सवर मोफत प्रवेश देखील दिला जात आहे.

जिओ फायबरचा हा प्लॅन 699 रुपयांचा आहे. 6 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसाठी, तुम्हाला या प्लॅनसाठी 4194 रुपये + GST ​​भरावे लागेल. या प्लॅनसह, कंपनी वापरकर्त्यांना 15 दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत देत आहे. हा प्लान अमर्यादित इंटरनेट डेटा देतो. प्लॅनमध्ये तुम्हाला 100Mbps चा अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल. हा जिओ फायबरचा बेस प्लान आहे आणि तुम्हाला यात कोणताही OTT लाभ मिळणार नाही.

150Mbps प्लॅन

Jio Fiber च्या या प्लान मध्ये 150Mbps चा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. हा प्लान अमर्यादित डेटासह येतो. त्याची वैधता 180 दिवसांची आहे आणि यासोबत कंपनी 15 दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग देखील मिळेल. प्लॅनमध्ये, कंपनी Jio Cinema, Amazon Prime Video, Disney + Hotstar, Sony Liv आणि ZEE5 यासह अनेक उत्तम OTT अॅप्सवर मोफत प्रवेश देत आहे. 6 महिन्यांसाठी प्लॅन सबस्क्राइब करण्यासाठी, तुम्हाला 5994 रुपये आणि GST भरावा लागेल.

300Mbps प्लॅन

या प्लॅनचे 6 मासिक सबस्क्रिप्शन शुल्क रुपये 8994 + GST ​​आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 15 दिवसांची अतिरिक्त वैधता देखील देत आहे. इंटरनेट वापरण्यासाठी, तुम्हाला या प्लॅनमध्ये 300Mbps स्पीड आणि अमर्यादित डेटा मिळेल. Jio Fiber चा हा प्लान फ्री व्हॉईस कॉलिंग सह देखील येतो. यामध्ये कंपनी नेटफ्लिक्स (बेसिक), अॅमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार, सोनी लिव्ह आणि ZEE5 सोबत Jio सिनेमाला फ्री ऐक्सेस देत आहे.