औरंगाबाद | कोरोना मुळे एम. फिल आणि पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांना तीन महिने संशोधनाचे काम करता आले नाही. या विद्यार्थ्यांना शोध प्रबंध सादर करण्यासाठी डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सोमवारी याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला डॉक्टर श्याम शिरसाट ,कुलसचिव डॉक्टर जयश्री सूर्यवंशी, संचालक डॉक्टर योगेश पाटील, व्यवस्थापन परिषद संजय निंबाळकर, डॉक्टर राजेश करपे, डॉक्टर फुलचंद सलामपुरे, डॉक्टर नरेंद्र काळे, किशोर शितोळे, डॉक्टर जय देशमुख, डॉक्टर हरिदास विधाते, राहुल मस्के, सुनील निकम यांच्यासह अधिष्ठता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
नवीन मंजूर 66 महाविद्यालयांपैकी 52 महाविद्यालयांची नकारात्मक शिफारस सदस्यांनी कायम ठेवली. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविद्यालय दिल्याने शैक्षणिक दर्जाचा हास होईल अशी भीती व्यक्त करताना कन्नड आणि सिल्लोड ला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा .अशी उपहासात्मक टिपणी केली .याशिवाय जालना जिल्ह्यातील किशोर कुमार जनकल्याण संस्थेने महाविद्यालय पुढील वर्षी सुरू करण्याची परवानगी मागितली आहे .चार महाविद्यालयांचे प्रस्ताव प्राप्त झाले नसल्याचे अधिष मंडळाने सांगितले तसेच प्राध्यापकांचे कॅश शिबिर जुलै महिन्यात घेण्यात आणि अध्यापक आला नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पीएचडी गाईडशिप देण्यास मान्यता दिली देण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर रमेश पांडव यांच्या मुदती वरून पुन्हा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत गोंधळ झाला तर राजकीय पद पदाधिकाऱ्याने राजभवन आकडे नोंदवलेला हस्तक्षेपामुळे नवीन संचालक डॉक्टर भगवान साखरे यांना पदभार स्थगिती देण्यात आल्याची चर्चा याबाबत राज भवनाकडे पाठपुरवठा करून महिनाभरात हा निर्णय बदलला जाईल असे आश्वासन त्यांनी ददिल्यावर वाद थांबला.