वंदे भारत एक्सप्रेसला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद; फक्त 25 दिवसात केला 2 कोटींचा गल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरातून थेट “वंदे भारत एक्सप्रेस” जात नसली तरी मुंबईवरून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याच्या मार्गे जात आहे. परंतु तरीदेखील पुणेकरांकडून “वंदे भारत एक्सप्रेस”ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबईसह आता पुण्यात देखील वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. गेल्या 25 दिवसात सोलापूर, मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसमधून तब्बल 24 हजार 894 प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामुळे एक्स्प्रेसची कमाई 2 कोटींच्या वर गेली आहे. आता या कमाईत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्य म्हणजे, वंदे भारत एक्सप्रेसला पुणेकरांकडूनच जास्त प्रतिसाद दिला जात असल्याचे समोर आले आहे. पुण्यात वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढल्यामुळे पुण्यात देखील एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या मागणीला विचारात घेऊन लवकरच पुणे स्टेशनवरून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. मध्यंतरीच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी, पुणे रेल्वे स्टेशनवरून तिची ट्रायल घेण्यात आली होती. ही ट्रायल यशस्वी झाल्याची माहिती देखील रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. मात्र एक्सप्रेस नेमकी कोणत्या तारखेला सुरू होईल हे सांगण्यात आले नव्हते.

सध्या राज्यात मुंबई-सोलापूर, मुंबई गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई शिर्डी अशा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मात्र आता पुणेकरांचा प्रतिसाद बघून पुणे आणि नागपूरमध्ये देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. एक्सप्रेस सुरू करण्यात आल्यानंतर प्रवास कालावधी फक्त सात तासांचा होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस योजना भारतीय रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे.

पुणेकरांकडून देखील वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या सोयीसुविधानामुळे जास्त प्रमाणात नागरिक याच एक्सप्रेसचे तिकीट बुक करत आहेत. यामुळेच फक्त 25 दिवसात वंदे भारत एक्सप्रेसने रेल्वे विभागाला तब्बल 2 कोटींच्या वर्गाला करून दिला आहे. तर याकाळात 25 हजार 894 जणांनी एक्सप्रेसने प्रवास केला आहे.