ब्रेक फेल झाला आणि मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिहार : वृत्तसंस्था – भारतात बिहारमध्ये गया जवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एक मालगाडी कोळसा घेऊन जाताना दिसत आहे. हि मालगाडी वेगाने जात असताना अचानक मालगाडीचे ब्रेक फेल (goods train derailed) झाले. गाडी थांबण्याऐवजी पुढे सरकत गेली. यानंतर या मालगाडीचे एका मागून एक या पद्धतीने 53 डबे रुळावरून (goods train derailed) घसरले.

कुठे घडली घटना?
बिहारमध्ये गया जवळ गुरपा स्टेशन आहे. या गुरपा स्टेशनजवळ हि दुर्घटना घडली. रुळावरून घसरलेली मालगाडी झारखंडमधील कोडरमा येथून बिहारमध्ये गयाच्या दिशेने जात होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामुळे (goods train derailed) या भागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. आणि तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले.

मालगाडी घसरल्यामुळे (goods train derailed) या भागातील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या उशिराने धावत आहेत. काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. अपघात ज्या मार्गावर झाला तो मार्ग दिल्ली-हावडा रेल्वे लाइनचा भाग आहे. यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय