Google Chrome : ऑगस्टपासून ‘या’ Mobile मध्ये बंद होणार Google Chrome

Google Chrome
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Chrome हे अँप तर तुम्ही नक्कीच वापरत असाल. आपल्याला काहीही सर्च करायचं असेल तर आपण सर्वात आधी गुगल क्रोम वर जातो आणि जे हवं ते सर्च करतो… सर्चिंग अँप असल्याने गुगल क्रोम चा वापरही जास्त होतो. परंतु तुम्हाला माहितेय का? येत्या ऑगस्ट महिन्यापासून गुगल क्रोम काही मोबाईल मध्ये चालणार नाही.. होय, ऑगस्ट 2025 पासून Android 8 (Oreo) आणि Android 9 (Pie) या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या मोबाईल साठी Google Chrome चा सपोर्ट बंद होणार आहे. याचा अर्थ असा की, या अँड्रॉइड व्हर्जन्सवर Chrome ला कोणतेही अपडेट्स मिळणार नाहीत.

गुगलने अधिकृतपणे जाहीर केले आहे की ते अँड्रॉइडच्या या जुन्या आवृत्त्या चालवणाऱ्या डिव्हाइसेसवर क्रोमला (Google Chrome) सपोर्ट बंद करत आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर Android 8 (Oreo) आणि Android 9 सिस्टीम वाला मोबाईल असेल तर तुमच्यात गुगल क्रोमचे नवीन अपडेट्स मिळणार नाहीत, मग ते सुरक्षा फीचर्स असो वा ना नवीन फीचर्स असो…… काही कालावधीनंतर तुम्हाला बग्स किंवा सुरक्षा भेद्यतेचा सामना करावा लागू शकतो, विशेषतः जर तुम्ही वारंवार ऑनलाइन संवेदनशील कामे ब्राउझ करत असाल तर .

किती लोक वापरतात गुगल क्रोम- Google Chrome

एप्रिल २०२५ च्या डेटानुसार, अजूनही ६% अँड्रॉइड मोबाईल वर अँड्रॉइड ९ सिस्टीम काम करते तर ४% वापरकर्ते अँड्रॉइड ८ आणि ८.१ व्ह्ज वापरतात. याचाच अर्थ असा कि जवळपास १० लोक या दोन्ही व्हर्जनचा वापर करतात, त्यामुळे आगामी काळात या यूजर्सना क्रोम पासून वंचित राहावं लागणार आहे. Chrome लगेचच काम करायचं थांबवणार नाही. पण त्याला भविष्यात कोणतेही अपडेट्स न मिळाल्याने बग्स, सिक्युरिटी लूपहोल्स आणि डेटा रिस्क वाढू शकते. विशेषतः जे वापरकर्ते इंटरनेटवर बँकिंग, ईमेल्स किंवा अन्य संवेदनशील काम करतात त्यांच्यासाठी अडचण ठरेल. गूगलने आपल्या वापरकर्त्यांना अधिकृत सपोर्ट पेजवर सल्ला दिला आहे की, “यूजर्सनी Android 10 किंवा त्यावरील वर्जनमध्ये लवकरात लवकर अपग्रेड करावं, जेणेकरून त्यांना Chrome चा पूर्ण अनुभव मिळत राहील.