आता स्वस्तात बुक करा विमानाचे तिकीट; Google आणतंय नवं फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्यापैकी अनेकजण विमानाने प्रवास करतात. विमानाचे भाडे हे फिक्स नसत, त्यात बरेच चढ उतार पाहायला मिळतात. अनेकजण आपल्याला ज्याठिकाणी जायचं आहे त्या शहराचे विमानाचे तिकीट कमी व्हाव यासाठी वाट बघतात किंवा स्वस्तात जेव्हा तिकीट मिळेल तेव्हाच ते बुक करतात. परंतु आता गुगल या आठवड्यात असं एक फीचर्स आणणार आहे ज्यामुळे तुम्ही अगदी स्वस्तात विमानाचे तिकीट बुक करू शकता

गुगलच्या या फीचर्सच्या माध्यमातून विमानाचे तिकीट कमी पैशात बुक करण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे हे कळू शकेल. याशिवाय, कंपनी Google Flights मध्ये ऐतिहासिक ट्रेंड आणि डेटा जोडत आहे, ज्याच्या मदतीने प्रवाशांनी निवडलेल्या तारखेसाठी आणि डेस्टिनेशन साठी तिकीटाची किंमत कधी सर्वात स्वस्त असेल हे जाणून घेण्यास मदत होईल. गुगल फ्लाइटचे हे फीचर प्रवाशांना विमान तिकीट केव्हा बुक करणे योग्य आहे हे सुद्धा सांगेल. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक चांगली सुविधा ठरेल.

रिपोर्टनुसार, Google Flights चे हे इनसाइट फीचर तुम्हाला फ्लाइट बुक करण्यासाठी सर्वोत्तम वेळेची माहिती देईल. फ्लाइट सुटण्याच्या 1 महिना आधी किंवा सुटण्याच्या काही तास आधी. या फीचरबाबत अद्याप टेस्टिंग सुरू असले तरी लवकरच हे फीचर जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही Google Flights मध्ये किंमत ट्रॅकिंगची सिस्टीम चालू केली तर अशा परिस्थितीत गुगल फ्लाइटचे हे फीचर विमानाच्या तिकिटाची किंमत कमी झाल्यावर तुम्हाला सूचना पाठवेल. परतू हे फीचर्स वापरण्यासाठी तुम्हाला Google मध्ये साइन इन करावे लागेल. Google Flights मध्ये, तुम्हाला अनेक फ्लाइट रिजल्ट हे रंगीबेरंगी बॅजमध्ये दिसतील. हे यासाठी कि, तुम्ही आता जे तिकीट रेट पाहत आहात तर विमान सुटण्याच्या वेळीही असेच राहील.