Google Map | आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील काही नियम हे ऑगस्ट महिन्यापासून चालू होणार आहेत. आता काही दिवसातच ऑगस्ट महिना सुरू होईल. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही ना काही बदल होत असतात. आता या बदलानुसार ऑगस्ट महिन्यात काही वस्तूंच्या किमती वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरक्त तान पडणार आहे. अशातच आता गुगल मॅपने देखील त्यांच्या काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत.
गुगल मॅप्सच्या (Google Map) अनेक नियम बदललेले आहेत. आणि हे नियम 1 ऑगस्ट 2024 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. गुगल मॅपने त्यांची किंमत 70% पर्यंत कमी केलेली आहे यासोबत गुगल मॅपचे शुल्क डॉलर ऐवजी आता भारतीय रुपयांमध्ये देखील करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. तसेच आता ऑलम्पिक नकाशा देखील तुम्ही विनामूल्य वापरू शकता.
सर्वसामान्य नागरिकांना आता या गुगल मॅपमधील (Google Map) बदलांचा जास्त काही परिणाम होणार नाही. परंतु जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी गुगल मॅपचा वापर करत असाल, तर यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. तसेच तुम्ही आता इथून पुढे भारतीय रुपयांमध्ये देखील हे पेमेंट करू शकता. सर्वसामान्य नागरिकांसाठी गुगल मॅपची सेवा ही मोफत आहे. परंतु तुम्ही जर त्याचा व्यवसायासाठी वापर केला, तर त्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागेल
रॅपिडो ही राइडिंग शेअर कंपनी आहे. कंपनी नेवीगेशनसाठी गुगल मॅप वापरत असते. अशावेळी जर तुम्ही गुगल मॅप वापरत असाल, तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. आणि आता त्या किमती बदलण्यात आलेल्या आहे. गुगल नेवीगेशन भारतीयांकडून दर महिन्याला जवळपास चार ते पाच डॉलर्स शुल्क आकारत होते. परंतु आता 1 ऑगस्टपासून तुम्हाला डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये पैसे भरता येणार आहे.