माणसानंतर आता Robot ही झाले बेरोजगार; Google ने 100 रोबोट काढून टाकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात आर्थिंक मंदीचे सावट असून गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. परंतु आता चक्क रोबोट सुद्धा बेरोजगार झाले आहेत. गुगलची पॅरेन्ट कंपनी असलेल्या अल्फाबेटने जवळपास 100 रोबोट्स कामावरून काढून टाकले आहेत. अल्फाबेटचा एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट बंद करण्यात आला आहे.

दरवाजे उघडण्यासाठी, कॅफेटेरिया टेबल स्वच्छ करण्यासाठी आणि कचरा वर्गीकरण करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या 100 रोबोना कमी करण्यात आलं आहे. “Everyday Robots” हे Google च्या मूळ कंपनी Alphabet च्या प्रोजेक्ट “X – The Moonshot Factory” प्रोग्रामचा भाग आहे. याचा मुख्य हेतू हा सामान्य-उद्देशीय कार्यांसाठी रोबोट तयार करणे हा होता. कोरोना महामारीच्या काळात कॉन्फरन्स रूमच्या स्वच्छतेसाठीही या रोबोट्सची मदत घेण्यात आली होती. आता रोबोट डिव्हिजन बंद झाल्यामुळे त्यातील काही तंत्रज्ञान इतर विभागांसाठी वापरता येईल.

दरम्यान, तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या सगळं काही ठीक दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक कंपनी कर्मचाऱ्यांना नारळ देत आहे. मायक्रोसॉफ्ट, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं होते. आर्थिक नुकसानीच्या कारणामुळे पैशाचा खर्च कमी कसा होईल याकडे कंपन्या लक्ष देत आहेत. यापूर्वी गुगलने जागतिक पातळीवर 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.