Google Pay देतंय 10 लाखांचं कर्ज; जाणून घ्या अटी व व्याजदर

loan (3)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे आता फक्त बँकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. तर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज गुगलच्या ‘गुगल पे’ (Google Pay) या डिजिटल पेमेंट अ‍ॅपने आता वैयक्तिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. वापरकर्ते आता गुगल पे द्वारे केवळ काही टॅप्समध्ये 30 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे त्वरित कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना उत्तम पर्याय निर्माण झाला आहे. तर या कर्जावर व्याजदर किती लागणार, यासाठी अटीशर्ती काय असतील अन अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

संपूर्ण प्रक्रिया डिजिटल –

गुगल पेने विविध बँकांशी भागीदारी करून ही सेवा सुरू केली असून कर्जाची कालमर्यादा 6 महिने ते 5 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे प्रत्यक्षात सादर करण्याची आवश्यकता नाही.

किती लागतो व्याजदर? –

गुगल पे वरून घेतल्या जाणाऱ्या कर्जावर 10.50% ते 15% पर्यंत वार्षिक व्याज आकारले जाते. हा दर वापरकर्त्याच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो. तसेच, कर्ज घेताना व्यक्तीचे वय किमान 21 वर्षे असणे आवश्यक असून त्याच्याकडे नियमित उत्पन्नाचा स्रोत असावा लागतो.

अर्ज प्रक्रिया अशी करा –

गुगल पे अ‍ॅप उघडा आणि Money टॅबवर जा.

Loan विभागात तुमच्यासाठी असलेल्या ऑफर्स पहा.

उपलब्ध ऑफरवर टॅप करा आणि सूचनांचे पालन करा.

KYC कागदपत्रे अपलोड करा अन Loan Agreement वर ई-स्वाक्षरी करा.

कर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल.

परतफेड प्रक्रिया कशी आहे ? –

तुम्ही घेतलेल्या कर्जाचा ईएमआय थेट तुमच्या बँकेतून कट केला जातो. यासाठी वापरकर्त्याच्या लिंक केलेल्या बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच त्यामध्ये पुरेशी रक्कम असावी. कर्ज घेताना परतफेडीचे वेळापत्रक, ईएमआय रक्कम आणि देय तारखा स्पष्टपणे सांगितल्या जातात.

महत्वाच्या गोष्टी –

वय – किमान 21 वर्षे

उत्पन्न – नियमित स्रोत आवश्यक

व्याजदर – 10.50% ते 15%

रक्कम – 30000 ते 10,00,000 रुपये

कालावधी – 6 महिने ते 5 वर्षे

अर्ज प्रक्रिया – पूर्णतः डिजिटल

डिजिटल युगात बँकेत प्रत्यक्ष न जाता, मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेण्याची ही सुविधा नागरिकांसाठी सोयीची आणि वेळ वाचवणारी ठरत आहे.