Google Pay ने लाँच केले UPI LITE फीचर्स; आता PIN न टाकताच करा Transaction

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ऑनलाईन पेमेंट करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. खिशात पैसे नसले तरी मोबाईलवरून गुगल पे, फोन पे, युपीआय या माध्यमातून आपण सहजतेने एकमेकांना पैसे ट्रान्सफर करू शकतोय. त्यामुळे व्यवहार अगदी सोपा झाला आहे. आता याचीच पुढची स्टेप म्हणजे गुगल पे ने आपल्या यूजर्स साठी UPI पिन न टाकता अतिशय फास्ट मध्ये आणि फक्त एका क्लीक वर UPI पेमेंट करता यावेत यासाठी UPI LITE फीचर्स लाँच केलं आहे.

UPI LITE च्या माध्यमातून तुम्ही एक वेळी जास्तीत जास्त २००० रुपये पेमेंट करू शकता. तसेच दिवसातून २ वेळा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. तसेच पिन न टाकता तुम्ही 200 रुपयांपर्यंतचे फास्ट ट्रान्झॅक्शन करू शकता. परतू याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा कि Google Pay वर फक्त एक UPI Lite अकाउंट तुम्ही बनवू शकता. UPI LITE अकाउंट वापरकर्त्याच्या बँक खात्याशी जोडलेले आहे. परंतु जारी करणार्‍या बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर रिअल- टाइम अवलंबून नाही, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या यूजर्सना सोप्या पद्धतीने आणि अतिशय फास्ट मध्ये पेमेंट्सचा अनुभव अॅक्सेस करून लहान रकमेचे व्यवहार सुलभ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे गुगलचे व्हीपी प्रॉडक्ट मॅनेजमेंट अंबरिश केघे यांनी म्हंटल. Google Pay चे यूजर्स त्यांच्या प्रोफाइल पेजवर जाऊन UPI LITE ऍक्टिव्हेट करू शकतात. लिंकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, यूजर्स त्यांच्या UPI LITE खात्यात रु. 2,000 पर्यंत रक्कम जोडू शकतील, ज्याचे जास्तीत जास्त लिमिट दर दिवसाला 4,000 रुपये आहे. व्यवहार पूर्ण करण्यासाठी, वापरकर्त्यांना “पे पिन-फ्री” वर टॅप करणे आवश्यक आहे.

UPI व्यवहार प्रक्रिया अधिक सोप्पी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2022 मध्ये UPI LITE फीचर्स लाँच केले होते आणि ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सक्षम केले आहे. आजपर्यंत पंधरा बँका UPI LITE ला सपोर्ट करत आहेत, आगामी महिन्यांत आणखी बँका फॉलो करतील असं म्हंटल जात आहे.