मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला तरी येईल शोधता; Google ने आणले खास फीचर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुगल आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणण्यावर भर देत असते. आता गुगलने अपग्रेड Find My Device नेटवर्क रोलआऊट केले आहे. ज्यामुळे स्मार्टफोन ऑफलाईन किंवा स्विच ऑफ असला तरी त्याला सहजपणे शोध घेता येणार आहे. सध्या हे फीचर फक्त अमेरिका आणि कॅनडामध्ये वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु लवकरच भारतामध्ये देखील ते सादर केले जाईल.

गुगलकडून अपग्रेड करण्यात आलेले Find My Device हे Crowdsourced Network काम करत आहे. यामुळे चोरी गेलेला एखादा फोन शोधण्यास सर्वाधिक मदत होते. म्हणजेच गुगलचे Find My Device ॲपल स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या Find My Network सारखेच काम करत आहे. याचा फायदा असा की, यामुळे तुमचा फोन कोणी घेतला असेल आणि तो स्वीच ऑफ करून ठेवला असेल तर तुम्हाला त्या फोनपर्यंत अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहोचता येईल.

सर्वात खास गोष्ट म्हणजे, गुगलचे हे Find My Device ऑफलाइन असताना ही काम करेल. या नव्या डिवाइसमुळे ऑफलाइन असलेल्या स्मार्टफोनची ही रिंग वाजेल. तसेच गुगल मॅपवर या स्मार्टफोनचे लोकेशन देखील पाहता येईल. परंतु, सध्या हे नवे फीचर फक्त Pixel 8 आणि Pixel 8 Pro वर उपलब्ध असेल. पुढे जाऊन गुगलच्या या नव्या फीचरचा उपयोग इतर कामांसाठी देखील करण्यात येईल.